Breaking
ब्रेकिंग

उद्या पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे महाआरोग्य तपासणी शिबीर व पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारीना नियुक्तीपत्र….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे महाआरोग्य तपासणी शिबीर

पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारीना नियुक्तीपत्र

महाआरोग्य तपासणी शिबीरास नागरिक व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील

ठाणे प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष श्री.वसंत मुंढे, राज्य संघटक श्री.संजयजी भोकरे, राज्य सरचिटणीस श्री.विश्वासराव आरोटे, प्रसिध्दी प्रमुख श्री.नवनाथ जाधव यांच्या आदेशानुसार कोकण विभागीय अध्यक्ष श्री.नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने पहिले *दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर* यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी पत्रकारितेचे जनक (दर्पणकार) बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त दि. ६ जानेवारी २०२३रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत* महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर जिल्हाच्यावतीने *”महाआरोग्य तपासणी शिबीराचे”* आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी ठाणे शहरातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांना *”टायटेन मेडिसीटी तर्फे”वैद्यकिय योजना कार्ड”* चे वाटप होणार आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे यांच्या उपस्थितीत ठाणे शहर जिल्हा कार्यकारणीचे नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

तरी ठाण्यातील जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी व पत्रकार बंधू भगिनीनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील मुख्य सल्लागार प्रमोद इंगळे, कोकण विभगीय प्रसिद्धी प्रमुख विलास शंभरकर, उपाध्यक्ष सुबोध कांबळे, मिनल पव‍ार सचिव अतुल तिवारी, कार्याध्यक्ष मिलिंद दाभोळकर, सतिशकुमार भावे,मनिष वाघ यांनी केली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे