बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.842 दिवा (पूर्व ) संलग्न आदर्श महिला मंडळ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…
अमित जाधव-संपादक
*बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.842 दिवा (पूर्व ) संलग्न आदर्श महिला मंडळ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.842 दिवा (पूर्व )या संघटनेच्या वतीने रविवार दिनांक १ मे २०२२ रोजी तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारकर्ते महामानव, विश्वरत्न, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली संघटनेच्या तसेच आदर्श महिला मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात पार पडली दिव्यातील सर्व समाजबंधू भगिनींना व सर्व सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनेच्या बांधवानी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची रूपरेषा वाढवली . जयंतीचा सोहळा पूर्ण दिवसभर सुरू होता संपूर्ण दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे होते सकाळच्या सत्रात धम्म ध्वजारोहण व धार्मिक विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तसेच अल्पोहाराची योग्य पद्धतीने सोय करण्यात आली होती त्यानंतर महिला संघटनेकडून दुपारचे भोजनदान देखील ठेवण्यात आले होते. सायंकाळच्या सत्रात महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, प्रमुख वक्त्यांची व्याख्याने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याबद्दल माहितीपर प्रभोधनात्मक व्याख्यान ठेवण्यात आले. त्यानंतर मान्यवर प्रमुख पाहुण्यांचे व विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ करण्यात आले.रात्री मुलांचे रेकॉर्डिंग डान्स व बुद्ध भीमगीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व संघटनेच्या वतीने सर्वांसाठी रात्रीचे भोजनदान करण्यात आले.
कार्यकारिणी :अध्यक्ष :आयु. उमेश मालोजी कदम कार्याध्यक्ष : आयु. अरुण ज.कदम
उपाध्यक्ष :आयु.अमित मनोहर सावंत सरचिटणीस :आयु. विजय राजाराम पवार सहचिटणीस:आयु. श्रीधर केशव सुर्वे खजिनदार :आयु. दिनेश मोतीराम जाधव हिशोब तपासणीस : आयु.संदिप जाधव
संदेशवाहक : आयु. राजेंद्र भिकाजी कांबळे महिला कार्यकारिणी :अध्यक्षा -सौ. स्वाती दिनेश जाधव कार्याध्यक्षा – सौ. शिल्पा सु. पवार उपाध्यक्षा : सौ. सुमेधा श्रीधर सुर्वे चिटणीस : सौ. विजया अशोक पवार सहचिटणीस : सौ. स्वाती नितीन कांबळे खजिनदार :ऋतिषा उमेश कदम ,हिशोब तपासणीस :सौ. रश्मी विजय पवार /सौ. शीला मिलिंद इंद्राळे संदेशवाहक : सौ. निशा पद्माकर जाधव ज्येष्ठ सल्लागार : आयु. सदानंद गो. जाधव, आयु. रमेश साळुंके, संघटक : आयु. रविंद्र सावंत, पद्माकर जाधव,प्रदीप सकपाळ, युवराज पवार,चंद्रकांत बेटकर, अशोक जाधव,राजेंद्र जाधव, निलेश मोहिते, राजेश मोहिते,राकेश साळुंके, अविनाश साळवी,
बंटी साळवी,मंगेश कदम, प्रविण जाधव, निलेश जाधव महिला संघटक :अर्चिता जाधव आदी पदाधिकार्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला