आग विझविण्यात आली आहे.आज दिनांक ०२/०४/२०२४ रोजी ०५:५२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे:- मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तक्रारदार यांनी काळसेकर हॉस्पिटल जवळ, वाय जंक्शन, शीळ रोड, कौसा, मुंब्रा, ठाणे या ठिकाणी वाय जंक्शन ब्रीज खाली पार्क केलेल्या टाटा कंपनीची बस क्रमांक MH 43 H 2588 या बसला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यु वाहनासह व ०१-फायर वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.सदर पार्क केलेली बस खाजगी असून बसमध्ये कोणीही प्रवासी नव्हते. वाहनाच्या चालक केबिन व पुढील बाजूस आग लागल्याने वाहनाच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने ०६:१५ वाजताच्या सुमारास पुर्णपणे विझविण्यात आली आहे.परिस्थिती नियंत्रणात आहे.असे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षा कडून कळविण्यात आले आहे



