Breaking
ब्रेकिंग

शिळ डायघर ह‌द्दीत अवैध हत्यारांच्या साठ्यासह दोन आरोपीना पोलिसांनी केलं जेरबंद..

बेधडक ठाणे न्यूज

0 2 0 9 0 8

ठाणे, दिवा ता ३० मार्च : दि. 30 मार्च 2024 रोजी 01:00 वा ते 2:00 वा चे सुमारास पोलिस उप निरीक्षक संकेत शिंदे हे आपल्या पथकासह शिळफाटा येथे नाकाबंदी करत असतांना रात्रौ 01.45 वा. सुमारास मुंब्रा पनवेल रोडने मुंब्रा दिशेने भरधाव वेगात येत असलेली एक रिक्षा पाहिली. त्यामध्ये दोन व्यक्ती बसलेले होते. त्यांच्यावर संशय आल्याने रिक्षा रोडच्या कडेला थांबवण्यास सांगून रिक्षा थांबवून रिक्षातील इसमांना विचारपुस करत असताना रिक्षात पाठीमागे बसलेले एक संशयीत इसम रिक्षातुन उतरून पळुन जात असताना पोउनि/शिंदे यांनी त्यास आवाज देउन थांबण्याचा इशारा केला असता, तो न थांबता पळुन जात होता. त्यास सोबत असणारे स्टाफच्या मदतीने पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली असता तो उडवाउडविची उत्तरे देऊ लागल्याने पोउपनि / संकेत शिंदे यांनी दोन पंचाना बोलावून त्यांना नांव पत्ता विचारून त्यांची अंगझडती घेतली असता एक लोखंडी कोयता, एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, दोन लोंखडी तलवार मिळून आले. त्यांचे ताब्यातील रिक्षाचे कागदपत्राबाबत विचारपूस केली असता सदरची रिक्षा ही दोन्ही आरोपीत आपसात मिळून अभयनगर परिसरातून चोरी केल्याची कबूली दिली. त्या अनुशंगाने शिळ डायघर पोलीस ठाण्यातील गुन्हे अभिलेख तपासला असता सदर रिक्षा ही शिळ डायघर पो. स्टे. गुन्हा रजि. क. 584/2024 भा.द.वि.क 379 प्रमाणे गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. सदरची रिक्षा व मुददेमाल हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे नमुद आरोपी इसमांविरूध्द शिळ डायघर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 706/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 सह महा. पो. का. क. 37(1), 37(3), 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला व तपास चालु आहे.

सदर अटक आरोपी नामे अरबाज शेख याने त्याचे निवदेन पंचनाम्यामध्ये दोघांनी मिळून चोरून आणलेल्या दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे. तसेच आरोपी नामे गौरव उर्फ बाल्या याच्या घर झडतीमध्ये 7 वेगवेगळ्या वर्णनाचे तलवार, सुरा, कायता मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे. अटक आरोपीत यांच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासात रिक्षा चोरीचे 3 गुन्हे उघडणीस आणले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे