Breaking
ब्रेकिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विद्यार्थ्यांप्रति संवेदना ,पावसात वाहून गेलेला पुर पाच दिवसात तयार, हेदुपाडा पुलाचे विद्यार्थ्यांच्या हस्ते लोकार्पण…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

शहापुर तालुक्यातील आदिवासी बहुल व दुर्मिळ समजल्या जानार्या पिवळी ग्रामपंचायत हद्दीतील हेदुपाडा या विस ते पंचवीस घरांच्या वस्तीवरील विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी जिर्ण झालेला लाकडी साकव पार करुन जिवघेणा प्रवास करावा लागत होता.याबाबत काही वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांवर वृत्त प्रसारीत होताच ह्या गंभिर समस्येची बाब राज्याचे संवेदनशिल मृख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास येताच तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी व तालुका प्रशासन यांना आदेश देवुन या ठिकाणी मजबुत लोखंडी पुलाची उभारणी करण्याचे आदेश दिले होते.

प्रशासनाने पाच दिवसात हा पुलाचे बांधकाम पुर्ण करुन आज मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ साहेबांचे विशेष कार्य आधिकारी तथा मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे समन्वयक मा.श्री.मंगेश चिवटे, शिवसेनेचे उपनेते मा.श्री प्रकाश पाटील,माजी आमदार मा.श्री.पांडुरंग बरोरा यांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या शुभहस्ते आज या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी शालेय विद्यार्थींनी मा.मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.तर यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तर उपस्थितांनी जि.प. शाळेला भेट देवुन तेथील मध्यांन्य भोजन व विद्यार्थयांचे मिळनार्या सुविधांची विचारपुस केली.यावेळी जि.प.कृषी सभापती संजय निमसे, जि.प.सदस्य निखिल बरोरा, तहसिलदार कोमल ठाकुर, गट विकास आधिकारी भास्कर रेंगडे,गट शिक्षण आधिकारी बी.टी चव्हाण, बांधकाम उपअभियंता खैरनार,स्थानिक सरपंच, उपसरपंच सह शिक्षक मुख्याधापक व पत्रकार प्रशांत गडगे, दिनेश पाचघरे, प्रकाश जाधव सह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे