दिवा पूर्वेतील नवीन तिकीट घराचे शिवसेनेकडून लोकार्पण,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी दिवा पूर्वेला तिकीट घर…
अमित जाधव - संपादक
दिवा पूर्व, मुंबई दिशेला पादचारी पुलावर होणार आणखी एक नवीन तिकीट घर होणार दिवा पूर्वेतील प्रवाशांना मोठा दिलासा
दिवा पूर्वेला तिकीट घर व्हावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून दिवेकर रेल्वे प्रवाशांची होती. खासदार डॉ.श्री.श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकाळात दिवा रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला आहे. अनेक सुविधांसोबतच आज तिकीट घराचं देखील लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना प्रवक्ते , मा.महापौर श्री.नरेश म्हस्के यांच्या हस्ते आज तिकीट घराचं उदघाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख, मा. उपमहापौर श्री.रमाकांत मढवी, ग्रामीण संघटक श्री.ब्रह्म पाटील, उपशहर प्रमुख श्री.गणेश मुंडे, नगरसेवक श्री.अमर पाटील,श्री.दिपक जाधव, नगरसेविका सौ.सुनीता मुंडे,सौ.दिपाली भगत,सौ.दर्शना चरणदास म्हात्रे, उपशहर प्रमुख, दिवा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष अँड.आदेश भगत, दिवा शहर अधिकारी, युवती सेना कु. साक्षी मढवी, विभाग प्रमुख श्री.चरणदास म्हात्रे, श्री.भालचंद्र भगत,श्री.गुरुनाथ पाटील,श्री.निलेश पाटील, श्री.शशिकांत पाटील, श्री.विनोद मढवी आदी कार्यकर्ते व दिवेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



