Breaking
ब्रेकिंग

कळवा खाडीत दोघांची महिला व पुरुषाची उडी, पुरुषाचा मृतदेह हाती,महिलेचा अद्याप शोध सुरू..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

काल दिनांक १५/०६/२०२४ रोजी २०:०० वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार *(माहिती देणारे – कळवा पोलीस स्थानक / पोलीस हवालदार श्री. भांगरे, ८१०८३८४८६२)* १९:०० वाजताच्या सुमारास मुंबई नाशिक हायवे, कळवा, ठाणे (प.) या ठिकाणी साकेत ब्रीजवरून दोन अज्ञात व्यक्तींनी  खाडीतील पाण्यामध्ये उड्या मारल्या होत्या.

*सदर घटनास्थळी दिनांक १५/०६/२०२४ रोजी अग्निशमन दलाच्या जवानांकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून शोधकार्य करण्यात आले, सुमारे ०१-तासांच्या प्रयत्नानंतर रात्रीचा अंधार असल्याने खाडीमध्ये शोधकार्य करणे शक्य नसल्याने पाण्यात बुडालेल्या व्यक्तींचे शोधकार्य पोलिसांच्या सूचनेनुसार तात्पुरते थांबविण्यात आले होते.*

आज दिनांक १६/०६/२०२४ पुन्हा सकाळी ०७ वाजल्यापासून सदर ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्यामार्फत ४ तास शोध कार्य करण्यात आले. सदर शोध कार्य करत असताना दोन व्यक्ती पैकी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला असून सदर मृतदेह खाडी मधून काढून पुढील कार्यवाहीसाठी कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.*

कळवा पोलीस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीचे नाव श्री. बबलू विश्वकर्मा (पु/३५ वर्ष, राहणार: इंदिरानगर, वागळे इस्टेट, ठाणे) आहे.*

सदर ठिकाणी कळवा पोलीस कर्मचारी यांच्या परवानगीने शोध कार्य थांबविण्यात आले आहे पुढील कार्यवाही व शोधकार्य त्यांच्या आदेशानुसार केली जाईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे