Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

समाज सेवक अमोल केंद्रे यांच ठाणे महापालिके विरोधात निषेध जाहिर आंदोलन…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 5 5

*दिव्यातील ठाणे महापालिकेच्या ढिम्म कारभार पुन्हा चव्हाट्यावर*

समाजसेवक अमोल केंद्रे यांनी फोडली वाचा…..

बेधडक ठाणे न्युज
9326551040

सदर बाब आपण माझ्या निदर्शनात आणून दिल्या बद्दल कंत्रातदार व सफाई कर्मचार्यांवर लवकरच योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल-सहायक आयुक्त -अलका खैर(दिवा प्रभाग समिती

ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात दिवसे दिवस कचरा समस्यां डोके वर काढत असताना दिवा शहर मुब्रा देवी कॉलनीतील श्लोक नगर, साक्षी इमारतीजवळील प्रचंड दुर्गंधी असलेला प्रभागातील अस्वच्छ परिसर समाजसेवक अमोल केंद्रे यांच्या जाहीर निषेध आंदोलनांने जागे होऊन ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षित असलेल्या नाल्यातील प्रचंड गाळ काढून स्वछ करण्यात आला तसेच सांडपण्याने तुडुंब भरलेला गलिच्छ नाला हा बाल कामगारांकडून स्वछ करून घेत असताना निदर्शनात आले तसेच सदर बालकामगारांना स्वतःच्या सुरक्षेसाठी ठाणे महापालिकेने कोणतेही साधन पुरविले नाही असे दिसून आले आहे समाज सेवक अमोल केंद्रे यांनी या वेळी जाहीर निषेध करून ठाणे महापालिकेस धारेवर धरले ‘यावेळी त्यांनी ढोल वाजवत स्थानिकराहिवासियाच्या मदतीने जाहीर निषेध अदोलन यशस्वीरित्या संपन्न केले अनेक राहिवासीयांनी स्थानिक नगरसेवक व ठाने महापालिका विरोधात त्रिव नाराजी व्यक्त करत आपले मत स्पष्ट केले सदर महापालिकेनी नियुक्त केले 40 कामगार कुठे आहेत असा खडा सवाल त्यांनी ठाणे महापालिकेला केला असून अद्याप महापालिकेने प्रति उत्तर न देता बाल कामगारांना गलिच्छ नाला कोणत्याही सुविधे विना स्वछ करण्यास धाडले असतांना दिसून आले
समाजसेवक अमोल केंद्रे यांनी बाल कामगाररांकडून सांडपण्याने तुडुंब भरलेला नाला साफ करून न घेता काम बंद करून ठाणे महापालिके अंतर्गत दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त अलका खैर यांना काही पत्रकार समक्ष भेटण्यास प्रउत्त केले व ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडूनच नाला साफ करण्यात येईल असे ठासून अखेर आज नाला करण्यात आला स्थानिक राहिवासीयांनी समससेवक अमोल धनराज केंद्रे याचे कौतुक करीत जाहीर आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे