Breaking
ब्रेकिंग

ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळली,एक जण जखमी…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 6 9

आज ठाण्यात दिनांक २१/१०/२०२४ रोजी २०:०५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार  १९:०० वाजताच्या सुमारास रेमंड कॉम्प्लेक्स, पोखरण रोड नं. ०१, वर्तकनगर, ठाणे (प) या ठिकाणी विस्टा बिल्डिंगच्या ए विंग (तळ + ४१ मजली) मधील एका लिफ्टचा (तळ मजल्यावरून वरती जात असताना) रोप लिफ्ट पहिल्या मजल्यावर असताना तुटला दरम्यान सदर लिफ्ट तळ मजल्यावर कोसळली. घटनास्थळी वर्तकनगर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१- इमर्जन्सी टेंडरसह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह उपस्थित होते.सदर ठिकाणी अपघातग्रस्त लिफ्ट मध्ये एकूण ०४ – व्यक्ती होत्या त्यातील एका मुलाला अत्यंत किरकोळ दुखापत झाली आहे असे यावेळी समजले आहे सदर तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून, संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे