ठाण्यात मनसेचा उत्कृष्ठ बचत गट पुरस्कार दिव्याच्या आगरी महिला शक्ती बचत गटाला, सौ.शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत..
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता १२ फेब्रुवारी : ठाणे मानपाच्या हद्दीतील दिवा-आगसन भागातील आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानची अनेक सामाजिक कामे व उपक्रम सुरु असतात त्याचेच सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान अंतर्गत आगरी महिला शक्ती बचत गटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणे येथे सौ. शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते उत्कृष्ठ बचत गट देऊन सन्मानीत करण्यात आले असून खाद्यसंस्कृती या श्रेणी मध्ये देखील प्रथम पारितोषिक नामांकन देण्यात आले आहे. याबद्दल सर्व स्तरातून आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या सर्व महिलांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा उषा मुंडे व सर्व प्रमुख पदाधिकारी महिलांना शर्मिला ठाकरे यांनी शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व तुळशीचे रोप देऊन काल सन्मानित केले. आगरी महिला शक्ती बचत गटांच्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारच्या शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ बनऊन उपलब्ध करून दिले आहेत तसेच अनेक प्रकारच्या घर उपयोगी वस्तू, विविध मसाले , तयार करून विक्रीसाठी ग्राहकांचा देखील मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळात असल्याने बचत गटाच्या सर्व महिला पदाधिकारी यांचं अथक परिश्रम व योगदान खूप मोलाचे आहे त्यामूळे हा पुरस्कार सर्व महिला व पदाधिकारी यांचाच आहे असे बचत गटाच्या अध्यक्षा उषा मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.



