डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ दिवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त शांतता मेणबत्ती रॅली आयोजित….
अमित जाधव - संपादक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ दिवा आयोजित अध्यक्ष आयु.एकनाथजी भगत ,कार्याध्यक्ष आयु.दिनेशजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न,बौद्धिसत्व प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिणीर्वाण दिन बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाला.मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजता मंडळाच्या वतीने शांतता मेणबत्ती रॅली चे आयोजन करण्यात आले.

ही शांतता रॅली दातिवली तलाव येथील सम्यक समता मंडळाने आयोजित केलेल्या अभिवादन स्थळापासून सुरुवात होऊन दिवा आगासन रोड मार्गे,सिद्धार्थ बुद्ध विहार बी.आर. नगर ,डॉ.आंबेडकर चौक व पुढे दिवा शिळ रोडवरून दिवा स्टेशनंजवळील जयभिम स्तंभ येथील अभिवादन स्थळी रात्री ठीक 12.00 वाजता पोहचली.त्याठिकाणी बुद्ध वंदना घेऊन हजारो अनुयायांनी आपल्या मुक्तीदात्याला मनोभावे विनम्र आदरांजली वाहून अभिवादन केले.दिनांक 6 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवसभर हे अभिवादन स्थळ समस्त दिव्यातील नागरिकांसाठी खूले ठेवण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना दिव्यातील आणि राज्यभरातून आलेल्या आंबेडकरी चळवळीतील गायक /गायिका यांनी बाबासाहेबाना सांगितिक आदरांजली गाण्याच्या माध्यमातून अर्पण केली.सम्पूर्ण दिवसभरात हजारो अनुयायांनी ज्यामध्ये लहान बालकांपासून ते वयोवृद्ध नागरिक,स्त्रिया व पुरुष यांचा सहभाग होता. व सायंकाळी 7.00 वाजता शील वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या प्रसंगी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली .त्या सर्वांचे मनापासून आभार मानुन् सेक्रेटरी आयु.विजय पवार यांनी धन्यवाद दिले.यात प्रामुख्याने आयु.बालाजी कदम,गंगाधर गायकवाड, मिलिंद गवई,नितेश इंगोले, विनोद भालेराव, प्रदीप सकपाळ,भरत मोहिते,सुशील महाडिक,राहुल जोगदंड,बापूसाहेब भोसले,संभाजी कदम,संतोष तांबे,नितीन रिंगणेकर,अभिषेक जाधव ,नितीन आवाडे, वआदी कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली.




