Breaking
ब्रेकिंग

दिव्यात इमारतीच्या तळ मजल्यावरती असलेल्या मीटर बॉक्स ला आग, एकूण ९५ मीटर बॉक्स जळून खाक…

अमित जाधव -- संपादक

0 2 0 9 7 4

दिनांक १७/०४/२०२५ रोजी ०५:१६ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार  सावित्रीबाई फुले बिल्डिंग, धर्मवीर नगर, दिवा – अगासन रोड, दिवा. ठाणे या ठिकाणी सावित्रीबाई फुले बिल्डिंग, बी- विंग(तळ + ०७ मजली इमारत)* या इमारतीच्या तळ मजल्यावरती असणाऱ्या मीटर रूममध्ये आग लागली होती. *सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह, ०१-फायर वाहनासह व टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर इमारतीच्या तळ मजल्यावरती असलेल्या मीटर बॉक्स रूममधील एकूण ९५ मीटर बॉक्स जळून नुकसान झाले आहे.*

सदर इमारतीचा विद्युत पुरवठा टोरंट पॉवर कर्मचारी यांच्याकडून सुरक्षतेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला आहे.सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने ०६:१६ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली आहे.*

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे