दिनांक ०६/०५/२०२४ रोजी ००:४२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार घटनेची माहिती देणारे:- मुंब्रा अग्निशमन केंद्र चुहा ब्रीज, रुही एंटरप्राइजेस जवळ, दिवा-मुंब्रा बायपास रोड, मुंब्रा, ठाणे. या ठिकाणी एका मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेल्या कॅबीन कंटेनरला (कंटेनर मालक- अज्ञात, कंटेनर – १०x२० फूट, कंटेनर मधील साहित्य- सोफा, लाकडी फर्निचर, व लग्न मंडपाचे साहित्य)* आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह, ०१- रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर आग लगेल्या कॅबीन कंटेनर मधील लग्न मंडपाचे साहित्य व लाकडी फर्निचर जळाले आहे.
सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून ०१:५१ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.असे कळविण्यात आले आहे