Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

उल्हासनगरात कुत्रीसह पिल्लाला झाडाला लटकावून फाशी….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

उल्हासनगरात कुत्रीसह पिल्लाला झाडाला लटकावून फाशी

उल्हासनगरात एका कुत्री (Dog) सह तिच्या पिल्ला (Puppy) ला झाडाला लटकावून फाशी देण्यात आल्याचा अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस (Hilline Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील साईनाथ कॉलनी परिसरात बुधवारी 16 मार्च रोजी रात्री एका कुत्रीला आणि तिच्या पिल्लाला गळफास देऊन झाडाला लटकवण्यात आले. ही बाब पीपल फॉर अॅनिमल संस्थेच्या प्राणीमित्र सृष्टी चुग यांना फोनद्वारे समजली. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी धाव घेतली असता त्या ठिकाणी एक कुत्री आणि तिचं लहान पिल्लू मृतावस्थेत आढळून आलं. त्यामुळे त्यांनी तातडीने दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी आयपीसी 429 आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे