दिवा शहरात ओळख लपवून सात महिने लपून बसलेल्या खुनाच्या प्रयत्न गुन्ह्यातील आरोपीच्या अखेर मालमत्ता व गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक करून आवळल्या मुसक्या…
अमित जाधव - संपादक
पोलीस आयुक्त ठाणे यांचे आदेशान्वये पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेत फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेण्याकरिता स्वतंत्र पोलिस पथक नेमण्यात आले असता वरिष्ठांकडुन वेळोवेळी मार्गदर्शन व सुचना प्राप्त होऊन त्या अनुषंगाने मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा घटकातील पोहवा/६५६७ प्रशांत भुर्के यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “कापुरवावडी पोलीस स्टेशन गु.रजि.नं. २१०/२०२३, भादंवि कलम ३०७,३२३,५०४,५०६ (२),१४३,१४४,१४७,१४८,१४९ मधील पाहिजे धिरज जॉनप्पा शिमर्मोन (सायमन)२७ वर्ष, व्यवसाय काहीही नसताना दिव्यात लपून बसलेला आहे खंडणीच्या गुन्हयात अटक असलेले साथीदार आरोपींना कोर्टात हजर करतेवेळी सदर आरोपीच्या भेटीसाठी शासकिय विश्रामगृह ठाणे या ठिकाणी येणार आहे.” अशा खात्रीशिर बातमीच्या आधारे मालमत्ता गुन्हे कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमुद ठिकाणी सापळा रचुन दबा धरून बसले असताना पाहिजे आरोपी हा नमुद ठिकाणी येताच पोहवा/भूर्के यांनी ओळखून त्यास पथकाचे मदतीने १५.१५ वा. ताब्यात घेतले. त्याच्याकडे नमुद गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले व त्याबाबत कापुरबावडी पोलीस स्टेशनला खात्री केली असता त्याचेविरूष्ट् वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्याने त्यास पुढील कार्यवाही साठी कापुरबावडी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.



