दिव्यात दातीवली तिसाई नगर येथे शिवसेनेच्या वतीने तिथी नुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…..
अमित जाधव-संपादक
दिव्यात दातीवली तिसाई नगर येथे शिवसेनेच्या वतीने तिथी नुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…..
दिवा-दोन वर्षांच्या कालखंडनंतर या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतिथीनुसार सोमवारी सायंकाळी दिव्यात शिवप्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढून ढोलताशांच्या गजरात जलोश करत अनेक शिवभक्त जय भवानी ,जय शिवाजी अशा घोषणा देत होते.
दिवा दातीवली तिसाई नगर येथे शिवसेना कार्यालय जवळ मोठ्या प्रमाणावर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.निलेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य आरोग्य शिबीर व इतर तपासण्या व शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.मांनवकल्यानं हॉस्पिटल मार्फत डॉक्टर पराग जोशी यांच्या देखरेखे खाली नागरिकांना मोफत औषधे देण्यात आले.
मा.उपमहापौर रमाकांत मढवी,नगरसेवक दर्शना चरणदास म्हात्रे,नगरसेवक दीपक जाधव,नगरसेवक सुनीता गणेश मुंडे,नगरसेवक दीपाली उमेश भगत,नगरसेवक अमर पाटील,नगरसेवक अंकिता पाटील,नगरसेवक शैलेश पाटील आदी मान्यवरांचा सन्मान व सत्कार यावेळी करण्यात आला
शिवसेनेच्या दिवा दातीवली शिवसेना शाखेच्या सर्व पद्धधिकारियानी अथक मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.अध्यक्ष व दातीवली शाखाप्रमुख निलेश म्हात्रे यांनी सर्वांच आभार मानत दरवर्षी प्रमाणे तिथी नुसार याच उत्सहात व जलोषात शिवजयंती साजरी करू असे स्पष्ट केले


