ब्रेकिंग
लाडकी बहीण योजना- मोठी गुडन्यूज,13 लाख बहिणींचे अर्ज प्रलंबित अर्ज लवकरच निकाली…
अमित जाधव - संपादक

विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. महिलांना 2100 रूपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज प्रलंबित होते. ते अर्जही आता निकाली काढण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यांपासून त्यांना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे, असे सांगण्यात आले.