दिव्यातील ठाणे महापालिकेच्या एकमेव आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय..* ठाकरे गटाचे स्थानिक विभाग प्रमुख योगेश निकम आक्रमक…
अमित जाधव - संपादक
ठाणे ता १२ ऑगस्ट – ठाणे महानगरपालिका हद्दीतील वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहरातील एकमेव आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची अनेक बाबतीत गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. सदर आरोग्य केंद्रात विकास म्हात्रे गेट, गणेश नगर, दातीवली, आगासन, गणेशपाडा तसेच दिवा शहरातील आसपासच्या परिसरातील नागरिक ठाणे महापालिकेचे एकमेव असलेल्या आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग, लहान मुले, ज्येष्ठ नागरीक, गर्भवती महिला तसेच दिव्यांग बांधव उपचारासाठी येत असताना त्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था तसेच अपुऱ्या औषधांचा तुटवडा, पिण्याच्या पाण्याची गैरसोय अशा अनेक त्रासाला समोर जावे लागत आहे. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या होणाऱ्या अनेक तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परिणामी आज ठाकरे शिवसनेचे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक विभागप्रमुख योगेश निकम यांनी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांना निवेदन देऊन सदर आरोग्य केंद्रातील तक्रारींचे तात्काळ निवारण करावे व रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलावी असे स्पष्ट केल आहे. प्रसंगी ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख योगेश निकम, शाखाप्रमुख प्रफुल पाष्टे, अनिश चव्हाण, प्राणिल कांबळे, नितीन डोईफोडे, साहिल डोईफोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



