0
2
0
9
7
4
खुशखबर ! मुंबईत आठ अतिरिक्त लोकल धावणार
मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. आता नववर्षानिमित्ताने एक-दोन नाही तर चक्क आठ अतिरिक्त लोकल धावणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण दरम्यान दोन, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान दोन, तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान चार लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. तर या गाड्यांची वेळ लवकर जाहीर केली जाणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
0
2
0
9
7
4



