Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाण्यात 27 वर्षांच्या जावयाकडून 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ठाण्यात 27 वर्षांच्या जावयाकडून 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार*

ठाणे जिल्ह्यामध्ये सासू आणि जावई यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये 27 वर्षांच्या जावयाने आपल्या 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी आरोपी जावयाविरुद्ध हिललाइन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी जावई फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

ही घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये घडली आहे. पीडित सासू हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर आरोपी जावई उल्हासनगर येथे राहतो.

आरोपी जावई हा लग्नापूर्वी आपल्या सासूवर एकतर्फी प्रेम करत होता. लाजेमुळे तो सासूशी लग्न करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने पीडितेच्या मुलीकडे लग्नाची मागणी केली. यानंतर पीडितेच्या मुलीचे आणि आरोपीचे 2018 साली लग्न झाले. यानंतर सासूने जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376,506 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. हि घटना घडल्यापासून आरोपी जावई फरार झाला आहे. आरोपी जावयाला लवकरच अटक करण्यात येईल. दरम्यान, आरोपी जावयाला अटक केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती स्टेशन प्रभारींनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे