ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप,300 क्षयरुग्णांना भाजप चे निरंजन डावखरे यांनी6 महिन्यासाठी घेतले दत्तक….
अमित जाधव-संपादक
ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप
ठाणे : ठाणे शहर क्षय रोग अधिकारी आणि कोव्हीड सेलचे हेड डॉक्टर प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली 480 टीबी रुग्णांना मोफत धान्य वाटप करण्यात आले, या वेळी भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे धान्य वाटप करण्यात आले यावेळी उपायुक्त मनीष जोशी, भाजपचे साठे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
यामध्ये निक्षय मित्र या योजनेच्या माध्यमातून जवळपास 480 क्षय रुग्णांना आज नरेंद्र बल्लाळ सभागृहात धान्य किट वाटप करण्यात आले, या योजनेमध्ये आमदार निरंजन डावखरे यांनी 300 रुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेतले आहे, व इतर दानशूर लोकांनी 180 रुग्णांना दत्तक घेतले आहे, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण 4800 रुग्णांनी पोषक आहारासाठी आपले नाव नोंदवले आहे, या पैकी 380 रुग्णांना पोषक आहार सहा महिने पुरविण्यात येणार आहे, या निक्षय योजनेमध्ये कोणीही दानशूर व्यक्ती एक रुग्ण सहा महिन्यासाठी दत्तक घेऊ शकते, एका रुग्णासाठी महिन्याला एक हजार प्रमाणे सहा महिन्याकरिता सहा हजार रुपये खर्च येणार आहे, एक दानशूर व्यक्ती कितीही रुग्ण सहा महिन्यासाठी दत्तक घेऊ शकतो,वेळी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी लोकांना आव्हान केले आहे आपले शहर क्षयरोग मुक्त करायचे असेल तर या योजने मध्ये सहभाग घ्यावा.



