Breaking
ब्रेकिंग

दिवावासियांना हक्काचे बस स्थानक नाही, दिवा चौकातील याच विद्युत फोल मुळे वाहतुकीस मोठा अडथळा,स्थानिक प्रशासनचां कानाडोळा…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता ५ डिसें : ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वाढती लोकसंख्या असलेल्या दिवा शहरातील असलेल्या एकमेव बस स्थानकाच्या जागेचा तिढा सुटता दिसत नाही. दररोज शेकडो प्रवाशी लोकलला गर्दी असल्याने ठाणे, नवीमुंबई, पनवेल किंवा डोंबिवलीला जाण्यासाठी बसचा पर्याय निवडतात व ये-जा करतात परंतू दिवा शहरातील एकमेव बस स्थानक असलेल्या ठिकाणी प्रवाश्यांसह ठाणे मनपा व नवी मुंबई मनपाच्या परिवहन कर्मचाऱ्यांना देखील अनेक अडचनींना सामोरे जावे लागत आहे. बस स्थानकातील जागेचा तिढा न सुटल्याने स्थानकावर रस्ता किंवा काँक्रिटीकरण करता येत नाही तर बस स्थानकात प्रवाश्यांना बसण्याची व्यवस्था करता येत नाही.

कोरोना काळापासून दिवा बस स्थानकातून बस सेवा सुरु झाल्या त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला परंतू दिवेकरांच्या वाट्याला मात्र उपेक्षाच पदरी पडल्याचे पहावयास मिळत आहे. ठाणे मनपाला कोटींच्या घरात दिवा शहरातून उत्पन्न मिळून देखील स्वतःचे एकमेक हक्काचे बस स्थानक उपलब्ध होऊ शकत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.सदर जागा खासगी मालकीच्या असल्याने बस स्थानकाजवळील वाहतूकोंडीस मुख्य अडथळा ठरलेला विद्युत पोल हटविण्यास देखील अडचणी निर्माण होत आहे परिणामी दिवा चौकात प्रचंड मोठ्यावाहतूक कोंडीला दिवेकरांना सामोरे जावे लागत आहे. ठाणे व नवी मुंबई परिवहन सेवेच्या वेळेनुसार सुटणाऱ्या बसेसला देखील अर्धा किमी अगोदर उभे रहावे लागते तर जिथे बसेस थांबतात तिथेही खासगी जागा मालक हटकतात. वर्षाचे बाराही महिने अनेक यातना सहन करत दिवेकर प्रवासी उन्हाळा, पावसाळा व हिवाळा बस साठी ताटकळत उभाच असतो यातून कधी सुटका होणार असा संतप्त सवाल दिवेकर नागरीक करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे