Breaking
ब्रेकिंग

ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात अनेक गावातील विद्युत टॉवर व वाहिन्यांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या…..मधुकर पाटील – शेतकरी भूमिपुत्र(दिवा)

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात अनेक गावातील विद्युत टॉवर व वाहिन्यांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या…..मधुकर पाटील – शेतकरी भूमिपुत्र

 

दिवा शहरातील जैष्ट समाजसेवक व शेतकरी भूमिपुत्र मधुकर पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील येथील दातिवली, म्हातार्डी, बेतावडे, आगासन व साबे गाव गावात विद्युत टॉवर व विज वाहिन्यांमुळे तेथील शेतकऱ्यांचे शेत जमिन बाधित झाल्या आहेत. तेथील शेतकऱ्यांना त्या संदर्भात शासनाकडून नुकसान भरपाई दिली गेली नाही. मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी यासंदर्भात वीज मनोरे आणि पारेषण वाहिन्यांच्या जागेसाठी सुधारित धोरण राबविण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना भरघोस मोबदला देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार गेल्या तीन वर्षातील खरेदी-विक्री व्यवहाराच्या दराचा सरासरी दर ग्राह्य धरून त्या सरासरी दराचे दुप्पट मोबदला आता शेतकरी व जमिन मालकाला मिळणार आहे असे नमूद करून सुद्धा नंतर या तारेखालील जमिनीसाठी एकुण ३० टक्के मोबदला दिला जाईल या निर्णयाची संपूर्ण राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे जाहीर केलेले आहे. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील दातिवली गावातील बाधीत झालेल्या शेतकरी व जमिन मालकांना सुध्दा न्याय मिळाला पाहीजे.
आमची राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी दिवा येथील दातिवली, म्हातार्डी, बेतावडे, आगासन व साबे गाव गावातील विद्युत टॉवर व वीज वाहिन्यांनी बाधित झालेल्या शेतकरी व जमिन मालकांचे बाधित जमिनीचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाने जाहीर केलेला मोबदला द्यावा असे आवाहन प्रती निवेदन वेळोवेळी करून सुद्धा यांची दखल न घेता नायब तहसीलदार यांच्यामार्फत ऊर्जा विभाग,टोरंट विद्युत पॉवर कंपनीला आद्याप प्रयंत कोणती कार्यवाही केली हे अर्जदारास कळवावे असे समन्स धाडण्यात आले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे