Breaking
ब्रेकिंग

दिवा मनसे कडून मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिवा मनसे कडून मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

दिवा मनसेचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून यावेळी दिव्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांना राज्यगीताची प्रतिमा भेट म्हणून देण्याचा अनोखा उपक्रम यावेळी राबविण्यात आला. सर्व शाळांमध्ये जाऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यगीताची प्रतिमा शाळांना भेट म्हणून दिल्या. सोबतच दिवा रेल्वे स्थानक परिसरात मी मराठी,माझी स्वाक्षरी मराठी या मोहिमे अंतर्गत मराठी स्वाक्षरी मोहीम दिवा मनसे कडून राबविण्यात आली, ज्याला दिव्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे