Breaking
आरोग्य व शिक्षणकृषिवार्तागुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शाळेने मोफत देण्याची दिवा मनसेची आग्रही भूमिका..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यातील शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शाळेने मोफत देण्याची दिवा मनसेची आग्रही भूमिका

दिव्यातील ज्या शाळांमध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (RTE) अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या आदेशानुसार मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य आणि गणवेश शाळेने पुरविणे बंधनकारक आहे. दिव्यातील ज्या ज्या शाळांमध्ये RTE अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत अशा सर्व शाळांमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेश मोफत पुरवायला हवेत अशी आग्रही मागणी आज दिवा मनसे तर्फे विभागअध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांनी या शाळांना पत्र पाठवून केली.

ज्या शाळा RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य पुरवणार नाहीत त्यांची रीतसर तक्रार शिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्याची तंबी मनसे कडून देण्यात आली आहे. दुसरीकडे दिवा मनसेने घेतलेल्या या भूमिकेचे पालकांकडून मात्र स्वागत करण्यात येत आहे. दिव्यात पालकवर्गाची होणारी लूट त्यानिमित्ताने थोडीफार कमी होईल अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे