ब्रेकिंगमहाराष्ट्र
दिव्यात शिळफाटा येथे 6 वर्षीय मुलीचा मृतदेह पाण्याच्या डबक्यात अढळला…
अमित जाधव - संपादक

0
2
5
9
9
3
आज सकाळच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार खान कंपाउंड, शिळफाटा, दिवा ठाणे या ठिकाणी खान कंपाउंड मागे कुमारी. कशफ नबीला फेहजान अहमद खान(स्त्री/ ०६ वर्षे, राहणार: रूम नंबर ६०२, आशना हाईट्स, शीळ फाटा) या मुलीचा मृतदेह पाण्याच्या डबक्यात आढळून आला होता. सदर घटनास्थळी शिळ अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी श्री. सरनोबत सो., डायघर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान १ इमर्जन्सी वाहनासह उपस्थित होते.
सदर ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून सदर मृतदेह बाहेर काढण्यात आला असून डायघर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये शववाहिकेतून पुढील कार्यवाहीकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथे पाठविण्यात आला आहे.*
0
2
5
9
9
3



