Breaking
ब्रेकिंग

दिवा शहरात लवकरच उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा*- रमाकांत मढवी, शिवसेना शहरप्रमुख..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 6 5

दिवा -दिवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा रहावा अशी दिवा शहरातील तमाम शिवप्रेमींची जुनी मागणी आहे. दिवावसीयांच्या लोकभावनेचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना दिवा शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी त्यासंदर्भात ठराव महापालिकेत प्रशासनाकडून करून घेतला. ठाणे महानगर पालिका यांनी जारी केलेल्या पत्रात ठराव क्रमांक १०० दिनांक २५/०७/२०२४ अन्वये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या कामी सद्यस्थितीत विभागामार्फत शिल्पकाराची निवड करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे म्हटले आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पर्याप्त निधी उपलब्ध व्हावा व विविध प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सुद्धा प्रयत्नशील असल्याचे शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी सांगितले आहे. ही आनंदाची बातमी दिवा शहरातील तमाम शिवभक्तांना देण्यासाठी शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठया संख्येने छञपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे