0
2
0
9
7
4
भाईंदर स्थानकात बाप-लेकाची आत्महत्या
मुंबईत लोकलसमोर उडी मारुन पिता पुत्राने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना भाईंदर रेल्वे स्टेशनवर घडली आहे. हरिश मेहता असे वडीलाचे तर जय मेहता असे मृत मुलाचे नाव आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर दोघेही एकमेकांशी बोलत जात होते. त्यानंतर दोघेही प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून काही अंतरापर्यंत जातात आणि विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर येतात. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
2
0
9
7
4



