Breaking
ब्रेकिंग

दिवा आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान चां असाही सामाजिक संदेश..प्रतिष्ठान द्वारे राबवलेल्या उपक्रमाचा मोबदला अंध मुलांच्या वसतिगृहाला दान..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा – आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान दिवा ,आगासन या संस्थेने दिवावांसियांच्या मनोरंजनासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवा महोत्सव मोठया उत्साहात आयोजित करण्यात आला होता सल्लग सहा दिवस दिवा महोत्सवाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शालेय स्पर्धा भजन गायन, ब्रास बँड, रांगोळी स्पर्धा, आदर्श शिक्षक,आदर्श माता, दिवा गुनीजन,दिवा गौरव, मॅरेथॉन, सांस्कृतिक डान्स, ग्राहक आणि खरेदीदारांसाठी मोठी बाजारपेठ, खवय्यांसाठी खाद्य स्टॉल या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते त्या निमित्ताने आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान च्या महिलांनी देखील हिरहिरीने सहभाग घेत आगरी खाणावळचा स्टॉल लावून दिवेकरांसाठी आगरी पद्धतीचे वेगवेगळे मांसाहारी पदार्थ अल्प दरात उपलब्ध करून देत आपली छाप पाडली स्टॉल ला दिवेकर नगिकांच्या शेकडोच्या गर्दीने प्रतिसाद मिळाला.असे संस्थेच्या अध्यक्षा उषा मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केले.

तसेच संस्थेने मिळालेला निधी बदलापूर येथील अंध मुलांच्या हॉस्टेल मध्ये देणगी स्वरूपात देऊन एक सामाजिक वसा हाती घेत आपली छाप पाडली व प्रगती कॉलेज च्या वतीने देखील सहकार्य लाभले आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान या महिलांची सर्वांना एकच विनंती आहे कि अंध मुलांच्या हॉस्टेल मध्ये भेट देऊन त्यांच्या कलागुणांना वाव दया आणि एक हात मदतीचा पुढे करा.आध्यक्ष उषा मुंडे.उपाध्यक्ष.रंजना तांडेल.,पूनम मुंडे,योगिता मुंडे,दीपिका मुंडे,सोनम मुंडे प्रीती पाटील. भारती म्हात्रे. ज्योती म्हात्रे. सविता वायले,भारती पाटील,तसेच प्रगती कॉलेज ग्रुप.ब्रिंक्स इंडिया प्रायव्हेट लि श्री.भास्कर अंकुश सातार्डेकर,
दर्पण प्रकाश मुंडे आणि मित्र परिवार उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे