कल्याण येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचार करुन तीची निघृणपणे हत्या करणा-या मुख्या आरोपीत यास ठाणे गुन्हे शाखा घटक ०३, कल्याण यांनी बुलढाणा जिल्हयातील शेगाव येथुन केले जेरबंद “
अमित जाधव - संपादक

ठाणे :- दि.२४/१२/२०२४ रोजी कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे, अपहरण झाले बाबत कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. ११९०/२०२४ वीएनएस २०२३ चे कलम १३७(२), १४०(१), ६५(२),६६,१०३,२३८, सह पोक्सो कलम ४ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने गुन्हे शाखा घटक ३. कल्याणचे पोलीस पथकाने नमुद आरोपीत विशाल गवळी, याचा त्याचे रहाते घरी, व परिसरात शोध घेतला असता तो आपले रहाते घरातून पळून गेल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर दि. २५/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा घटक ३. कल्याणचे पोलीस पथक यांना, गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीत विशाल गवळी हा, बुलढाणा जिल्हयामध्ये असल्याचे समजले, सखोल तपास केला असता सदर आरोपी हा बुलढाणा जिल्हयातील शेगाव याठिकाणी असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा घटक ३. चे पथक बुलढाणा, शेगाव याठिकाणी, जावून बुलढाणा शेगाव शहर, पोलीसांची मदत घेवून सदर गंभीर व संवेदनशील गुन्हयातील मुख्य आरोपीत विशाल गवळी यास ताब्यात घेवून, त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास अटक केली.
सदरची कामगीरी मा. श्री. आशुतोष डुंबरे सो, पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त गुन्हे, व मा. श्री. शेखर बागडे, सहा.पो.आयुक्त शोध १, गुन्हे शाखा ठाणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. अजित शिंदे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक/सचिन गायकवाड, घटक १. वरिष्ठ पोलीस निरिक्षक/संजय शिंदे, मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, वरिष्ठ पोलीस निरिक्षक/गोरखनाथ घार्गे, मालमत्ता शोध कक्ष, वरिष्ठ पोलीस निरिक्षक/सलील भोसले, घटक ५, वागळे इस्टेट, सपोनि / संतोष उगलमुगले, घटक – ३. कल्याण, सपोनि / भुषण शिंदे, घटक ५, वागळे इस्टेट, पोउपनि/दिपक घुगे, घटक १, ठाणे, पोउपनि/दिपक पाटील, मध्यवर्ती कक्ष, पोलीस अंमलदार/दत्ताराम भोसले, प्रशांत वानखेडे, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, सतिष सोनावणे, मिथुन राठोड, विलास कडु, दिपक महाजन, गोरखनाथ पोटे, विजेंद्र नवसारे, किशोर पाटील, रविंद्र लांडगे, सर्व नेमणुक घटक ३, यांनी केलेली आहे.