Breaking
ब्रेकिंग

डोंबिवली निळजे येथील तडे गेलेल्या इमारत बाधित नागरिकाच्या पाठीशी, मनसे आमदार राजूदादा पाटील..

अमित जाधव , संपादक

0 2 0 9 7 4

लोढा हेवन येथील *शांती उपवन* सोसायटीच्या इमारतीला तडे गेल्याने काही ठिकाणीचे स्लॅब (माती) कोसळत असल्याचे सोसायटीतील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने रहिवाशांकडून संपूर्ण वसाहत तातडीने खाली करण्यात आली आहे. शिवाय कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडू नये या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे *आमदार मा.श्री.प्रमोद(राजू) रतन पाटील* हे काल रात्री पासूनच स्वतः मदत कार्यास धावून आले आहेत.शिवाय काल पासूनच मनसेचे पदाधिकारी रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी रात्रभर प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर *आमदार मा. श्री राजुदादा पाटील* यांच्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन,प्रभाग अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी सदर ठिकाणी दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या गाड्या देखील रात्रीपासून घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्रसंगी सोसायटीच्या रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था व भोजन व्यवस्था करण्यासंबंधितच्या सूचना कार्यकर्त्यांना आमदार राजू दादा पाटील यांनी दिल्या आहेत.

*आमदार मा श्री राजुदादा पाटील* या विभागाचे लोकप्रतिनिधी,आमदार असल्याने ते स्वतः नागरिकांच्या सर्वतोपरी मदतीला धावून आले असून सोसायटीचे *स्ट्रक्चर ऑडिट* झाल्या शिवाय रहिवाशांना सोसायटीच्या आवारात जाण्यास किंवा प्रवेश वर्ज करण्यात आला आहे.आज दिवसभर आमदार राजुदादा पाटील यांच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासन व अग्निशमन दल कार्यरत असणार आह.*रहिवासी स्थलांतरितचे वृत्त खोट असल्याचे आता मला एका रहिवाशांनी फोन करून कळवले आहे.* मात्र मदत कार्यास *आमदार मा श्री राजुदादा पाटील* हे स्वतः निष्ठेने रहिवाशांच्या मदतीला धावून आले असून घटनास्थळी तळ ठोकुन आहेत.
*नागरिकांनी कोणत्याही अफवेच्या बातम्यांना बळी पडू नये* सोसायटीच्या एकूण पाच विंग असून एकूण सदनिका धारक २४० आहेत.त्यांच्या मदतीसाठी *आमदार मा श्री राजुदादा पाटील* कटिबद्ध असल्याचे यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असल्याने सोसायटीतील नागरिकानी समाधान व्यक्त केलं आहे.
————————–

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे