0
2
0
9
7
4
डोंबिवलीत गाडी पार्कंगवरून झालेल्या वादातून एकाचा मृत्यू झाला आहे. बबलू गुप्ता असे मृताचे नाव आहे. गोळवली परिसरात बबलूचे पेपरचे गोडावून आहे. त्या ठिकाणी पिकअप गाडी लावण्यावर काही तरुणांसोबत त्याचा वाद झाला. त्या तरुणांनी इतर तरुणांना बोलावून बबलूसह त्याचा कामगारांना बेदम मारहाण केली. कामगार पळून गेले पण बबलू तिथेच राहिला. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बबलूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
0
2
0
9
7
4



