Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

लोकनेते श्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ध्वनिचित्रफितीचे उद्या अनावरण….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️लोकनेते श्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ध्वनिचित्रफितीचे उद्या अनावरण*

ठाणे, ता 7 फेब्रु ( संतोष पडवळ) :– राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे आणि कोरोनापासून महापुरापर्यंत प्रत्येक संकटाच्या वेळी सर्वात प्रथम धावून जाणारे लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या ‘लोकनाथ’ या गीताचे, अर्थात ध्वनिचित्रफितीचे अनावऱण उद्या, मगळवार ८ फेब्रुवारी रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होत आहे.

एससीआर कम्युनिकेअर, साहील मोशन आर्ट्स, सुमन एन्टरमेंट आणि सप्तसूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे गाणे तयार करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी लिहिलेल्या गीताला प्रसिद्ध संगीतकार चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर आणि अवधूत गुप्ते यांनी या गीताला स्वरसाज चढवला असून निमंत्रितांच्या साक्षीने सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांच्या हस्ते या गीताचे अनावरण होणार आहे.

या कार्यक्रमाला महापौर नरेश म्हस्के, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महेश पाठक, पोलिस महासंचालक संजय पांडे, पोलिस आयुक्त जयजीत सिंग, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नवी मुंबई महापालिकेचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले आदींसह शिवसेनेसह इतर राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

एससीआर कम्युनिकेअरच्या वतीने गेल्या वर्षी ‘अनाथांचा नाथ एकनाथ’ या गाण्याचे अनावरण करण्यात आले होते. या गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली होती. राजकारणापेक्षाही समाजकारणावर भर देणारे एकनाथ शिंदे यांनी कधीही प्रसिद्धीचा सोस बाळगला नाही. त्यामुळेच सोशल मीडियाचा विस्फोट झालेल्या या काळातही ते कधीही अनावश्यक प्रसिद्धीच्या झोतात दिसत नाहीत. अशावेळी त्यांच्या कामाचा सर्वांगीण आलेख लोकांसमोर येण्यासाठी गतवर्षीप्रमाणेच यंदाही गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

000000

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे