ठाण्यात रंगणार आयपीएलचा थरार…? CM एकनाथ शिंदे यांनी दिले संकेत … सचिन जोशी च्या पहिल्या फाईव्हस्टार हॉटेल्सचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन* चिकन मलाई टीका आणि कबाब ही अस्वाद घेतला….
अमित जाधव - संपादक
ठाण्यात रंगणार आयपीएलचा थरार…? CM एकनाथ शिंदे यांनी दिले संकेत …
सचिन जोशी च्या पहिल्या फाईव्हस्टार हॉटेल्सचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन* चिकन मलाई टीका आणि कबाब ही अस्वाद घेतला….
ठाणे : महाराष्ट्रातील उद्योग गुजरात राज्यात जात असतानाच ठाण्यात हिरानंदानी इस्टेट बेयर जवळ सचिन जोशी यांच्या पहिल्या ठाण्यातील फाईव्हस्टार हॉटेल “प्लॅनेट हॉलिवूड” याचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. स्वत: सचिन जोशीने मुख्यमंत्र्यांना चिकन मलाई टीका आणि कबाब खायला दिले व त्यांनी चव घेतली, फाईव्हस्टार हॉटेल ही ठाणेकरांना पर्वणी ठरणार आहे. आशियातील एक ब्रँडेड पंचतारांकित हॉटेल “प्लॅनेट बॉलिवूड” ठरत आहे.
ठाण्यात आशियातील प्रसिद्ध ब्रॅण्डचा दुसरा अविष्कार ठाण्यात प्लॅनेट हॉलीवूड हा दुसरा प्रकल्प ठाण्यात फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या माध्यमातून सुरु करण्यात आला आहे. गोवा राज्यानंतर दुसरे पंचतारांकित हॉटेल ठाण्यात सुरु करण्यात आलेले आहे. अभिनेता-उद्योजक सचिन जोशीचा जागतिक ब्रँडचा भारतीय फ्रँचायझी ” प्लॅनेट हॉलिवूड” आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सचिन जोशी, जेएम जोशी आणि उर्वशी शर्मा जोशी यांना आर्थिक विस्तार आणि ठाणेकरांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ठाणेकरांसाठी मेट्रो आणि रोडवेजसारख्या पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधांचा विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला. पंचतारांकित वातावरणासह 125 खोल्या पाहून आणि अद्यावत पंचतारांकित सुविधा पाहून मुख्यमंत्र्यांनी आयपीएलचे सामने येत्या काही वर्षांत ठाण्यात कसे आयोजित केले जातील याबद्दल सांगितले. कारण या फाईव्हस्टार हॉटेल्सच्या आगमनाने आता खेळाडूंच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या काही वर्षात ठाण्यात आयपीएल घेता येतील असे सूतोवाच यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.



