अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांना व्यायाम करताना जिम मध्येच हृदयविकाराचा झटका,जागेवरच मृत्यू…
अमित जाधव - संपादक
अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांना व्यायाम करताना जिम मध्येच हृदयविकाराचा झटका,जागेवरच मृत्यू…
मुबाईतील राहणारे सिद्धांत 46 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1975 रोजी मुंबईत झाला होता. त्यांनी ‘कुसुम’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कृष्णा-अर्जुन’, ‘जमीन से आसमान तक’, ‘क्या दिल में है’ या मालिकांमध्ये काम केलं होतं.
काही दिवसांपूर्वी कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचा सुद्धा असाच मृत्यू झाला होता. पुनीत राजकुमार अत्यंत फिट असल्याचं म्हटलं जात होतं. ते 46 वर्षांचे होते.तर अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचासुद्धा व्यायाम करताना अटॅक येऊन मृत्यू झाला होता.
आहार तज्ज्ञांचा सल्ला….
आजच्या काळात तरुणांमध्ये जिममध्ये जाऊन मसल्स तयार करण्याबाबत एक वेड निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
”अनेक जिममध्ये तरुणांना स्टेरॉईड घेण्याचा सल्ला दिला जातो. स्टेरॉईड आरोग्यासाठी चांगले नसतात. भारतात अशा जिमची संख्या कमीदेखील असू शकते. पण हा अत्यंत चर्चेचा विषय आहे,” असं मत असोसिएशन ऑफ हेल्थ प्रोव्हायडर्सचे अध्यक्ष डॉ. अॅलेक्सेंडर थॉमस यांनी मांडलं.
“जिममध्ये जाणाऱ्या लोकांनी प्रोटीन घ्यायला हवं अशी मान्यता आहे. मात्र, त्याला कसलाही आधार नाही. असं करणं चुकीचं आहे. डाएटमध्ये प्रोटीनची कमतरचा नसेल, तोपर्यंत सप्लिमेंट घ्यायची काहीही गरज नसते. जे लोक क्रीडा क्षेत्रांशी संबंधित असतात तेदेखील डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्रोटीन घेतात,” असं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शीला कृष्णास्वामी म्हणाल्या.