Breaking
ब्रेकिंग

मुंब्रा येथे रिक्षा चालकाकडून डॉक्टरची दगडाने ठेचून हत्या…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता २१ : शिळ-डायघर पोलीस हद्दीत डॉ.सिराज अहमद मंजुर अहमद खान वय 62 वर्षे, रा.अमृतनगर, मुंब्रा, यांनी आरोपी वसीम सत्तार मेमन, वय 44 वर्षे, व्यवसाय-रिक्षाचालक, रा.अमृतनगर, मुंब्रा याचे कडे गाडीचा टॅक्स भरण्यासाठी पैसे दिले होते. परंतू आरोपी वसीम मेमन हा टॅक्स भरण्यास व घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यावरुन डॉ.सिराज खान हे त्यास वारंवार फोन करुन विचारणा करीत होते. तसेच त्याच्यांत या गोष्टीवरुन भांडणही झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून, आरोपी वसीम मेमन याने, दि.19.09.2023 रोजी 01.00 वा. ते 08.35 वा. चे दरम्यान, डॉ.सिराज अहमद मंजुर अहमद खान यांना रिक्षातुन फडके पाडा येथे घेवुन जावुन तेथे त्यांचे डोक्यावर दगडाने मारून त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे.

सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा रजि.नं. । 403/23 भा.द.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोनि/श्री.वरूडे हे करीत आहे.असे जन संपर्क अधिकारी, पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर कळविण्यात आले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे