ब्रेकिंग
दिवा शहरातील नागरिकांसाठी गणेशोत्सव निमित्त मुंब्रा पोलीस स्टेशन च्या वतीने जाहीर आवाहान…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवा -पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर,अंतर्गत महाराष्ट्र पोलीस,मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे शहर यांचेतर्फे
दिवा शहरातील नागरिकांना गणेशोत्सवानिमीत्त हार्दिक शुभेच्छा देत दिवा शहरातील नागरिकांसाठी जाहीर आवाहान केले
> गणेशोत्सवानिमीत्त बाहेरगावी जाताना आपल्या घराला लावलेले कुलुप मजबूत आहे याची खात्री करा आणि सर्व दारे व खिडक्या व्यवस्थित बंद ठेवा.
> गणेशोत्सवानिमीत्त बाहेरगावी जाताना आपल्याकडील मौल्यवान वस्तु, दागिने, रोख रक्कम घरी ठेवु नका ते सुरक्षित ठिकाणी ठेवा.
> गणेशोत्सवानिमीत्त बाहेरगावी जाताना शेजा-यांना कल्पना द्या आणि त्यांचेसोबत संपर्कात रहा.
> गणेशोत्सवानिमीत्त बाहेरगावी जाताना आपल्या घरातील शॉर्ट सर्किटचा धोका टाळण्यासाठी मुख्य विजेचे बटण बंद करा.
> घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा यामुळे सुरक्षा वाढते आणि गुन्हेगारांना पकडण्यास मदत होते.
मा. श्री.एस.एस. बुरसे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, ठाणे शहर,मा. श्रीमती प्रिया डमाळे
सहा. पोलीस आयुक्त, कळवा विभाग, ठाणे शहर. अनिल शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे शहर यांनी कळविले आहे
0
2
0
9
7
4



