Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषिवार्ताकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजन

मदतीचे आश्वासन नाही तर थेट मदतच करणारा,… मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच बचत गटांना विशेष सहकार्य.. 

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
 ठाणे, दिवा ता १८ नोव्हें – दिवा शहरातील महिला बचत गटाला मदतीचा हात मिळाल्याने मोठं पाठबळ मिळाले आहे. दिवा शहरातील कार्यसम्राट मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वतीने आज श्री समर्थ चरण व सदगुरू कृपा महिला बचत गटाला स्वयंरोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाकरी तयार करण्याच्या यंत्र तसेच इतर सामग्री देऊन सदर महिला बचत गटास पुढे ही लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन श्री पाटील यांनी दिले आहे. महिलांच्या उदरनिर्वाहासाठी व महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांचा नेहमीच पुढाकार असतो असे त्यांचे निकटवर्तीय व विभाग प्रमुख भालचंद्र भगत यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
बचत गटामुळे महिला सक्षम होत आहेतच, त्याच बरोबरीने अनेक महिलांच्या छोटया मोठ्या उद्योगाना पाठबळ मिळत आहे. दिवा पश्चिम या भागातील महिलांनी अनेक छोटे मोठ्या व्यवसायाना जोड दिली आहे. दोनशे पेक्षा अधिक महिलांना ऑटो रिक्षा आणि इतर महिलांना पाटील यांनी मदतरुपी सहकार्य केलआहे. तसेच दिवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. दिवा शहरातील प्रत्येक सामाजिक उपक्रमांमध्ये बचतगटातील महिलांचा पुढाकार असतो असे बचत गटाच्या काही महिलांनी सांगितले असून श्री समर्थ चरण व सदगुरू कृपा महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी श्री पाटील यांचे अभिनंदन करून आभार मानले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे