दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल साठी अमोल केंद्रे यांचा पुन्हा एल्गार..
अमित जाधव - संपादक
हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा…
समाजसेवक अमोल धनराज केंद्रे
आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी सामान्य नागरिक जीव मुठीत घेवून प्रवास करत आहेत.सन २०१४ पासून प्रत्त्येक प्रवाशांची मागणी एकच आहे.दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू व्हावी.आत्ता पर्यंत हजारो नागरिकांचे,विद्यार्थ्यांचे जीव गेले आहेत.कोणाची आई,कोणाची बहीण,कोणाचा भाऊ,कोणाचे वडील गेले.प्रत्त्येक वेळी फक्त निवडणूक डोळ्या समोर ठेवून खोटे आश्वासन दिले जाते.रेल्वे प्रशासन,रेल्वे मंत्री,राजकीय पक्ष याकडे दुर्लक्ष करत आहे.
लोकशाही मार्गाने अनेक वेळा आंदोलन केले.स्वाक्षरी मोहीम घेतली.त्याचे निवेदन,राज्यपाल,राजकीय नेते मंत्री,खासदार,रेल्वे प्रशासन सर्वांना दिले.२१ मार्च २०२३ मध्ये मोर्चा काढला,१६ ऑगस्ट २०२४ मध्ये ७ दिवस आमरण उपोषण केले.सन २०२४ वर्ष संपणार आहे.२०२५ मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला तरी माता,भगिनी वडीलधारे प्रवाशी बांधवांचे विद्यार्थ्यांचे जीव वाचवण्यासाठी दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू करावी यासाठी नवीन सरकारचे,रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिवा स्टेशन पूर्व रिक्षा स्टँड बाजूला दिनांक २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजे पर्यंत लक्षवेधी ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे.सदर आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या,रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नसून दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू करण्यासाठी आहे असे निवेदन मंडळ रेल्वे प्रबंधक,मध्य रेल्वे मुंबई यांना दिवा स्टेशन प्रबंधक यांच्या मार्फत देण्यात आले.यावेळी स्टेशन उप प्रबंधक दिवा यांना दिले असून समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी नागरिकांना स्वतः साठी,स्वतःच्या परिवारासाठी,आपल्याच जीवघेण्या प्रवासातून मुक्तता मिळण्यासाठी दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू करण्यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रवाशी माता, भगिनी वडीलधारे, विद्यार्थी यांना विनंती केली आहे.



