Breaking
ब्रेकिंग

मुंब्रा बायपास येथे सिमेंट मिक्सर पलटी, एकाचा मृत्यू तर 6 जन जखमी..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

आज दिनांक १५/०६/२०२४ रोजी २०:२८ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार घटनेची माहिती  मुंब्रा अग्निशमन केंद्र याना मिळाली असता गौतमी नर्सिंग होम जवळ, मुंब्रा बायपास बाजूला, सम्राट नगर, मुंब्रा, ठाणे या ठिकाणी बायपास वरून सम्राट नगर कडे उतरणाऱ्या रस्त्यावर MH ०४ JK ६४१७ RMC mixer मालक – अज्ञात / चालक – अज्ञात या वाहनाच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सर बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी होऊन अपघात झाला आहे.*सदर घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी ०३ रुग्णवाहिकेसह तसेच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अग्निशमन दलाचे जवान ०१- इमर्जन्सी टेंडर व ०१- रेस्क्यु वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित आहेत.*

*सदर घटनेत मिक्सर पलटी झाल्याने एकुण ०७ – स्थानिक रहिवाशी जखमी झाले असून उपचाराकरिता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची माहिती खालीलप्रमाणे:-*
१)* श्री. विशाल सोनावणे *(पु/ २५ वर्षे / प्राईम हॉस्पिटल, मुंब्रा येथे दाखल करण्यात आले आहे.)*
*२)* श्री. अशिक इनामदार *(पु / 15 वर्षे / गौतमी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.)*
*३)* श्री. प्रभाकर सलियान *(पु / ४८ वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.)*
*४)* श्री. अब्दुल वफा *(पु/ ५० वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.)*
*५)* श्री. फरीद शेख *(पु / ५४ वर्षे / बुरहानी हॉस्पिटल, मुंब्रा)*
*६)* श्रीमती आशा दाधवड *(स्त्री / ५८ वर्षे / बुरहानी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.घटनेमध्ये मृत व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे

:-१)* श्री. नासिर शेख *(पु / १४ वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केल्यानंतर मृत असल्याचे घोषित करण्यात आले आहे.सदर अपघातग्रस्त वाहन पोलीस कर्मचाऱ्यांकडून हायड्राच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे