बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात ठाणे मनपा, धडाकेबाज प्रतिष्ठान व इंडो टेक फाउंडेशनचा लोन मेळावा..

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता २८ ऑगस्ट : दिवा शहरात पथ विक्रेता, लहान व्यवसायिक, महिला बचत गट, घरगुती व्यवसाय यांच्या साठी १०,००० (दहा हजार) रुपयांचा लोन मेळावा पार पडला. सदर लोन साठी आवश्यक कागदपत्रे सादर करत अनेक गरजू लोकांनी सहभाग नोंदवला असून त्याचा फायदा अनेक छोट्या व गरीब व्यावसायिकांना होणार आहे. प्रसंगी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अमोल केंद्रे, अश्विनी केंद्रे, ज्योती पाटील, श्रीराम पोळ, मंगेश कोळेकर, विजय यादव, नितीन आवाडे, सुमन ससाने, मयूरी राजापकर, धनश्री महाडीक, मनीषा दाभाडे, स्वप्नाली माने, राजश्री आयवले, सरला गायकर, शरद गायकर, प्रकाश गावडे, बावस्कर, जगदीश भुवड, रोशन गवाने, अजित मानकर, सतिश दवंडे, संतोष पताडे, अनिल मोर्या, कृष्णा जाधव, अक्षय तांबे तर इंडो टेक फाउंडेशनच्या रेश्मा खरात, ठाणे मनपा अंतर्गत दिवा प्रभाग समितीचे त्रिभुवन साहेब उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे