Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवलीदरम्यान उद्या सकाळी 10 पर्यन्त विशेष ब्लॉक-मध्यरेल्वे …

अमित जाधव - संपादक

0 2 5 9 9 3

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ३ व ४ च्या विस्तारासाठी आणि डोंबिवली स्थानकावरील फलाट १ अ, १ आणि २ च्या विस्तारासाठी डाऊन आणि अप धीम्या मार्गावर विशेष ब्लॉक असेल. हा ब्लॉक शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून सुरू होईल. तर, रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू असेल. मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवलीदरम्यान ब्लॉक असेल.

शनिवारी रात्री १०.४९ वाजता परळहून सुटणाऱ्या आणि रात्री १२.१२ वाजता सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल, रविवारी पहाटे ४.४५ वाजता विद्याविहारहून सुटणाऱ्या आणि सकाळी ९.०५ वाजता सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यानंतर ठाणे स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. याव्यतिरिक्त इतर डाऊन धीम्या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.

शनिवारी रात्री ११.२६ ते रात्री ११.५२ आणि रात्री ३.२३ ते सकाळी ९.५५ या वेळेत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल कल्याण येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. दिवा ते ठाणे स्थानकांदरम्यान या लोकल पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच आणखी काही अप धीम्या लोकल ठाणे ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत, अप आणि डाऊन जलद लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांतही थांबतील. रविवारी डोंबिवली येथून सुरू होणाऱ्या आणि डोंबिवली येथे समाप्त होणाऱ्या लोकल रद्द असतील. ब्लॉक कालावधीत, मुलुंड-ठाणे आणि दिवा-कल्याण स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन दिशेकडील सर्व लोकल रद्द असतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

 

5/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 9 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे