यंदा नवरात्री उत्सवांच्या निमित्ताने दिवावासीयांच्या मनोरंजनासाठी मा.नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी दिवा विकास प्रतिष्ठान, मा. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे मित्र मंडळ आयोजित तीन ते चार ठिकाणी भव्यदिव्य व्यासपीठावर ऑर्केस्ट्रा व रास दांडियाचे आयोजन….
अमित जाधव-संपादक
दिव्यातील नागरिकांना रास गरब्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मा. नगरसेवक पाटील यांनी स्वखर्चातून तीन ते चार ठिकाणी भव्य दिव्य व्यासपीठावर डीजे च्या तालावर ऑर्केष्ट्रा आयोजित करून दिवावासीयांचा आनंद द्विगुणिक करण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य गायक व गाईकाना आमंत्रित करून भव्य रास गरब्याचे आयोजन केले आहे
दिव्यातील असंख्य महिला वर्ग,जैष्ठ नागरिकांनी त्याबद्दल मा. नगरसेवक शैलेश पाटील यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहे
तसेच दिवा विकास प्रतिष्ठान पुरस्कृत सद्गुरू नगर येथे भव्य दिव्य असा रास गरबा ,आयोजक,दिवा शहराचे लाडके लोकप्रिय,सुप्रसिद्ध,मा.नगरसेवक श्री शैलेश मनोहर पाटील त्यांच्यातर्फे प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
लकी ड्रॉ स्पर्धत महिलांना विविध प्रकारचे बक्षीस वितरण करण्यात येत होते दरवेळी असंख्य नागरिक रास गरब्यासाठी येत असताना दिसत आहेत
शाखा_प्रमुख -श्री.संजय भगत व श्री.महेश म्हात्रे, श्री.राजू कांबळे,व कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ विजेत्यांना विविध प्रकारचे गिफ्ट देण्यात आले,
त्या वेळी पाटील यांचे कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.या लकी ड्रॉ मुळे तमाम सद्गुरू नगरच्या दांडिया रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला..



