Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

गुढीपाडवा लॉटरी विक्रीचा शुभारंभ.,दोन लाख किंमतीच्या एक हजार तिकिटांच्या खरेदीचा मुहूर्त!

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*गुढीपाडवा लॉटरी विक्रीचा शुभारंभ.*

दोन लाख किंमतीच्या एक हजार तिकिटांच्या खरेदीचा मुहूर्त!

मुंबई दि. (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य लॉटरीचा गुढीपाडवा भव्यतम सोडतीच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ मंत्रालयात राज्य लॉटरी आयुक्त श्री. अनिल भंडारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी लॉटरी विक्रेत्यांचे ज्येष्ठ नेते. श्री. विलास सातार्डेकर यांनी दोन लाख रुपये किंमतीच्या एक हजार तिकिटांची खरेदी करून एक आदर्श असा मुहूर्तरुपी पायंडाच पार पाडला!

देशभरात पारदर्शक आणि प्रतिष्ठित असणारी महाराष्ट्र राज्य लॉटरी च्या गुढीपाडवा भव्यतम सोडातीच्या तिकीट विक्री शुभारंभ सोहळ्यात लॉटरी आयुक्त अनिल भंडारी यांच्यासह लॉटरी उपसंचालक प्रशांत पाटील, उपसंचालक (वित्त व लेखा) श्रीमती आशा ठोंबरे, कक्ष अधिकारी संदेश ओव्हाळ, शीला यादव, लेखा अधिकारी सुनील लोटणकर यांच्यासह लॉटरी विक्रेता संघटनेचे पदाधिकारी मंत्रालयातील आयुक्तांच्या दालनात उपस्थित होते.

गुढीपाडव्याचे पहिले सामायिक हमीपात्र बक्षिस ५१ लाख असून तिकीटांची किंमत २०० रुपये आहे. एकूण बक्षिसांची रक्कम ९८,५५,००० असून ही तिकीट सर्वाधिक प्रमाणात ग्राहकांनी खरेदी करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी केले. परराज्यातील लॉटरी विकणाऱ्या विक्रेत्यांनी आता महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्री केली पाहिजे, एकीकडे राज्याला महसूल आणि दुसरीकडे विक्रेत्यांना रोजगाराची संधी यातून मिळते असेही सातार्डेकर यांनी सांगितले. हमीपात्र बक्षिसांमुळे ग्राहकांची झुंबड उडणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.

यावेळी लॉटरी विक्रेत्यांच्या सर्व संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते.
त्याचप्रमाणे लॉटरीचे मुख्य वितरक सर्वश्री. महेंद्र गणात्रा, विजय सामी, मनीष शहा. उप वितरक ताराचंद सावंत, गणेश कांबळे, सुरेश भगत, स्नेहल शहा, सत्यवान पेडणेकर, अमर शहा उपस्थित होते. तसेच लॉटरी संघटनेचे पदाधिकारी कमलेश विश्वकर्मा, संजय शेट्टे, राकेश उंबळकर, सुमित सातार्डेकर, दिलीप यादव व तुलसीदास कोठेकर उपस्थित होते.
लॉटरी आयुक्तांचा याप्रसंगी पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे