Breaking
ब्रेकिंग

दिवा स्थानकादरम्यान AC लोकलच्या छतावार बसून प्रवास करणाऱ्या इसमाला विद्युत तारेचा जबर झटका..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे। मध्य रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्थानकात न वातानुकूलित (एसी) रेल्वे गाडीच्या छतावर बसलेल्या तरुणाला विद्युत तारेचा झटका लागला. या घटनेत तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर काहीकाळ परिणाम झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणच्या दिशेने वातानुकूलित रेल्वेगाडी निघाली होती. ही रेल्वेगाडी मंगळवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास दिवा रेल्वे स्थानकावर आली असता एक व्यक्ती वर रेल्वे गाडीच्या छतावर बसल्याचे आढळून आले. प्रवाशांनी तात्काळ याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान (आरपीएफ), रेल्वे प्रशासनातील इतर कर्मचारी दाखल झाले. प्रवासी आणि कर्मचारी तरुणाला छतावरुन उतरण्याची विनंती करत असतानाच, त्याला विद्युत तारेचा झटका बसला. त्याला तात्काळ उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजरुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात नेण्यात आले.

5/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे