Breaking
ब्रेकिंग

ठाणे शहरात काही दिवस अनियमित पाणीपुरवठा* पंंपिंग स्टेशनमध्ये येत असलेल्या गाळामुळे पंपिंग क्षमतेवर झाला परिणाम,पाणी गाळून पिण्याचे आवाहन…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे (२०) :* सलग तीन दिवस भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा, व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. नदीपात्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिसे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे या पंपिंग स्टेशनवर पूर्ण क्षमतेने पंपिंग होण्यात अडथळे येत आहेत. तसेच, पाण्याच्या गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा सुमारे २५ टक्के कमी झाला आहे.

पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे शहरामध्ये पुढील काही दिवस अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच, या काळात पाणी उकळून प्यावे आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे