Breaking
ब्रेकिंग

आमदार राजू पाटील यांच्या प्रचार फेऱ्या झंजावाती, नागरिकांचा स्फूर्त सहभाग…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात सर्वच पक्षानी प्रचारात वेग घेतला आहे. नेते, उमेदवार आणि पदाधिकारी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दरमजल करीत आहेत. मनसेचे उमेदवार तथा आमदार राजू पाटील यांची भेटीगाठी प्रचाराची पहीली फेरी पूर्ण झाली असून आता ते चौकसभांवर भर देत आहेत. कल्याण ग्रामीण संपूर्ण मतदारक्षेत्र पाटील यांनी पिंजून काढत असून त्यांना ग्रामीण भागात पूर्ण सहकार्य मिळण्याचा विश्वास आहे. आमदार राजू पाटील यांनी केलेल्या कामावर मतदार खुष असल्याचे पदाधिकारी बोलत आहेत. तिरंगी लढत असली तरी राजू पाटील यांचे पारडे जड आहे अशी चर्चा कल्याण ग्रामीणमध्ये होत आहे.

राजू पाटील यांनी दिवा पश्चिम, मुंब्रा देवी कॉलनी विभागात भेट देऊन तेथील नागरिकांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाटील सांगत आहेत. दरम्यान, परिसरातील गणेशोत्सव मंडळ आणि नवरात्रोत्सोव मंडळांकडून आमदार राजू पाटील यांच स्वागत करण्यात आलं. तसेच मतदारांकडून आ. राजू पाटील यांना विजयासाठी शुभेच्छाही मिळाल्या आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांचा मतदार संघात झंझावाती प्रचार सुरू असून त्यांनी विरोधकांवर प्रचारात आघाडी घेतली असल्याची चर्चा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे