बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर येथे गुंडगिरीच्या जोरावर अल्पसंख्यांक संस्थेची मिळकत बळकविण्याचा प्रयत्न,जागेवर कब्जा केल्याने मराठी मिशनचे आझाद मैदान येथे उपोषण…

अमित जाधव-संपादक

अहमदनगर येथे गुंडगिरीच्या जोरावर अल्पसंख्यांक संस्थेची मिळकत बळकविण्याचा प्रयत्न

जागेवर कब्जा केल्याने मराठी मिशनचे आझाद मैदान येथे उपोषण

मुंबई (प्रतिनिधी ) अहमदनगर येथे अल्पसंख्यांक ख्रिश्चन संस्थेची अमेरिकन मराठी मिशनची जागा गुंडगिरी व शस्त्र्याच्या बळावर अनधिकृतपणे कब्जा करण्याचा प्रकार घडला असून त्याबाबत पोलिस प्रशासनाकडे कारवाईसाठी मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून युनायटेड चर्च बोर्ड फाँर वर्ल्ड मिनिस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरु केले आहे.
याबाबत पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार अहमदनगर येथे अल्पसंख्यांक ख्रिश्चन संस्थेची अमेरिकन मराठी मिशनची जागा आहे.त्या जागेवर गुंडगिरीच्या जोरावर सुमारे शंभर ते दिडशे गुंड हातात तलवारी लाठ्या घेवून आले.या जागेवर वाहनातून साहीत्य आणून कब्जा ठोकण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी पोलिसांनी अनधिकृत कब्जा केल्याबद्दल चार जणांना ताब्यात घेतले परंतु त्यांच्यावर अद्यापही एफआयआर दाखल केलेली नाही.याउलट त्यांच्याकडे रिव्हाल्वर असतानाही त्यांची चौकशी न करता सोडून देण्यात आल्याचा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या प्रकारामुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिसरात येथील गुंड रात्री बे रात्री केव्हाही चकरा मारत असल्याने कधीही दंगल होऊ शकते.त्यामुळे पोलिस अधिक्षकांनी तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी आझाद मैदानात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे.दरम्यान पोलिस प्रशासनाने कारवाई न केल्यास आमच्याकडे आत्मदहनाशिवाय पर्याय नसल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण समाचारशी बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे