Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राष्ट्रीय क्षयरोग दिनाच्या निमित्त ठाणे मनपाचा क्षयमुक्त ठाणे, भयमुक्त ठाणे उपक्रम….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕राष्ट्रीय क्षयरोग दिनाच्या निमित्त ठाणे मनपाचा क्षयमुक्त ठाणे, भयमुक्त ठाणे उपक्रम.*

ठाणे / दिवा, ता 24 मार्च ( संतोष पडवळ) : आज 24 मार्च राष्ट्रीय क्षयरोग दिन, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरणकार्यक्रम अंतर्गत शहर क्षयरोग नियंत्रण कक्ष आयोजित ठाणे महानगरपालिकेचा “क्षयमुक्त ठाणे, भयमुक्त ठाणे” उपक्रम ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. क्षयरोग पूर्ण बरा होतो या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला, वजन कमी होणे, रोज रात्री हलकासा ताप, मानेवर असलेली गाठ अशी लक्षणे आढळून आल्यास ठाणे महापालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्रात क्षयरोगावर चाचण्या व इलाज मोफत उपलब्ध आहे याची जागृती ठाणे मनापाचे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत आहे. प्रसंगी आज दिवा रेल्वे स्टेशनवर आरोग्य विभागचे श्री अधर कुलकर्णी, संजय पवार, आकाश गिजे, संजय ढोबळे व अरुण मुंडे यांनी सादरीकरण करून जनजागृती केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे