Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स कौन्सिलच्या वाडा तालुका कौतुकास्पद कामगिरी,आदिवासी महिलेच्या बाळाचे रुग्णालय बिल कमी करून पुढील वैद्यकीय सेवा मोफत करून…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

वाडा तालुक्यातील एका सोनाली वनगे नावाच्या गरोदर आदिवासी महिलेला सातव्या महिन्यात रात्रीच्या वेळी खूप पोटात दुखू लागले त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला जवळच असलेल्या भिवंडी येथील गोरे हॉस्पिटल मध्ये अडमिट केले त्यानंतर चेकअप सोनोग्राफी केल्यानंतर समजले की गर्भात दोन बेबी आहेत आणि खूप कमजोर आहे त्यांचं वजन फक्त 1/1kg आहे त्यामुळे सिझर करावं लागेल आणि बेबि ना icu मध्ये ठेवावे लागेले त्यांना रोजचा हॉस्पिटल खर्च 15000 होईल सदर व्यक्तीची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी युनिव्हर्सल ह्युमन राईट्स कौन्सिलच्या वाडा तालुका अध्यक्षा श्रीमती रोठे यांना फोन करून सांगितले रोठे यांनी त्या बाळांची व्यवस्था वाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून केली परंतु गोरे हॉस्पिटल चे 6 दिवसांचे बिल 90,000/- भरल्याशिवाय बेबीला डिस्चार्ज मिळणार नाही हे समजल्यावर रोठे यांनी महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुवर्णा कदम यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थिती सांगितली तसेच सादर हॉस्पिटल मध्ये वाडा तालुका अध्यक्षा श्रीमती सुचित्रा रोठे आणि उपाध्यक्षा सौ उषा मोरे यांनी भेट देऊन बाबींची तब्बेतीबद्दल चौकशी केली आणि बिलासंदर्भात पूर्ण माहिती घेऊन बिल कमी करण्यास सांगितले त्यानंतर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुवर्णा कदम यांनी त्या हॉस्पिटल चे Dr गणेश गोरे यांच्याशी संपर्क साधून बिल कमी करण्यासाठी चर्चा करून विनंती केली त्यांच्या विनंतीस मान देऊन सदर dr नी फक्त 30,000 /-bill घेण्यास तयार झाले आणि बेबी ची यापुढची ट्रीटमेंट आम्ही इथेच करू आणि याप्रमाणेच बिल घेऊ व लागणाऱ्या सर्व औषधे मोफत देऊ असे आश्वासन दिले त्याबद्दल युनिव्हर्सल ह्युमन राईट्स कौन्सिल भारत च्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुवर्णा कदम आणि वाडा तालुका अध्यक्षा श्रीमती सुचित्रा रोठे आणि वाडा तालुका उपअध्यक्ष सौ उषा मोरे यांचे खुप खुप धन्यवाद🙏🙏🌹🌹🌹

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे